बार्शी |
बार्शी तालुक्यातील बळेवाडी येथील घडलेल्या घटनेबाबत सोशल मिडीया माध्यमातून गृहविभाग, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या पर्यंत पोहचविण्यासाठी संजय राऊत यांनी सोशल माध्यमाचा वापर केला असून त्यामध्ये त्यांनी त्या व्यक्तीची ओळख, त्या व्यक्तीचे नांव, त्या व्यक्तीवर कोणते गुन्हे दाखल झाले या बाबत कोणताही उल्लेख त्या माध्यमावर केलेला नसून त्याची खातरजमा आपण करुन घ्यावी.
त्या बाबत खासदार संजय राऊत यांच्यावरती राजकीय आकसापोटी बार्शी शहर पोलिस स्टेशनमध्ये दाखल केलेला गुन्हा तात्काळ रद्द करावा अशा आशयाचे निवेदन अजिंक्य बारंगुळे युवासेना ( बार्शी विधानसभा प्रमुख ) यांनी दिले आहे. पीडित तरुणीची ओळख जाहीर केली म्हणून खासदार संजय राऊत यांच्यावर बार्शी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.