५०खोके घेऊन चोर आले, असे बोल असलेले रॅप सॉंग सध्या तुफान व्हायरल झाले आहे. मात्र, याचा निर्माता रॅपर राज मुंगासेला पोलिसांनी अटक करून त्याला अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. शिंदे गटाच्यावतीने गुन्हा दाखल करण्यात आल्यापासून रॅपर राज कुठे आहे याची माहिती नव्हती.
पोलिसांनी अटक केली असेल तर तो कोणत्या ठाण्यात आहे याची माहिती मिळत नसल्याने राजच्या बांधून सांगितले होते तसेच त्याची काळजी व्यक्त केली होती दरम्यान, आज विधानपरिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी आज फेसबुकवर रॅपर राजसोबत फोटो शेअर करत कल्याणच्या जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन मंजूर केल्याची माहिती दिली आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रॅपर राजचा ” ५०खोके घेऊन चोर आले” हा व्हिडिओ शेअर केल्यामुळे अल्पवधीतच तो लोकप्रिय झाला. मात्र, या गाण्यातून शिंदे गटाची, आमदारांची बदनामी होत असल्याचा आरोप करत शिंदे गटाच्यावतीने रॅपर राज मुंगासेवर अंबरनाथ येथे गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हापासून राज गायब होता.
कधी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी तर कधी जालना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याची चर्चा होती. त्याच्या अटकेची अधिकृत माहिती मिळत नसल्याने नातेवाईकांसह अनेक राजकीय नेत्यांनी चिंता व्यक्त केली होती. यावरून शिंदे-भाजप सरकारला टीकेचे लक्ष करण्यात आले आहे.
अखेर रॅपर राज मुंगासेचा शोध लागला आहे. आज विधानपरिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी राज सोबतचा फोटो फेसबुकवर शेअर केला आहे. यासोबतच त्यांनी राज याला कल्याणच्या जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जमीन मंजूर केल्याची माहिती दिली. अशाप्रकारे एका कलाकाराला अटक करून त्याच्यावर केस घालणे चुकीचे असल्याचे दानवे यांनी यावेळी म्हंटले होते