छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर सर्व स्थरातून टीका होत असून त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी सर्वांनी केली आहे. दरम्यान औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेत बोलतांना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील राज्यपाल यांच्यावर निशाना साधला. मात्र याचवेळी टीका करतांना दानवे यांची जीभ घसरली आणि त्यांनी राज्यपाल यांच्यावर शिवराळ भाषेत टीका केली. तर माझ्यावर काय गुन्हा दाखल करायचं ते करा मात्र असेच बोलणार असल्याचे देखील दानवे म्हणाले.
राज्यपाल यांनी छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावर बोलतांना दानवे म्हणाले की, एक काळी टोपीवाला काल औरंगाबादमध्ये आला होता. अरे हरा***, मी बोलणारच, काय गुन्हा दाखल करायचा माझ्यावर तो करा. छत्रपती शिवाजी महाराज आजच्या काळाचे देखील आदर्श आहेत लक्षात ठेवा, मी जबाबदारीने बोलतो. गुन्हा दाखल झाला आणि अटक झाली तरीही चालेल असे दानवे म्हणाले.
आधीच्या काळात अनेक लोक सुटकेसाठी माफी मागत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनीही औरंगजेबला पाच वेळा पत्र लिहिलं होतं, असे विधान करणाऱ्या राज्यसभा खासदार आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचा देखील यावेळी दानवे यांनी समाचार घेतला. ‘अरे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे भवानी तलवार होती. आज जर शिवाजी महाराज असते तर त्यांनी तुझी जीभ एका मिनटात कापली असती’, असा निशाना दानवे यांनी सुधांशू त्रिवेदी यांच्यावर साधला.