मुंबई | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना अखेर रात्री ईडीनं अटक केली. तब्बल 17 तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या कार्यालयात राऊत यांना रात्री साडेबाराच्या सुमारास अटक करण्यात आली. पत्राचाळ घोटाळ्यात ईडीनं ही कारवाई केली आहे.
यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी यांदर्भात मोठं वक्तव्य केलंय, ते म्हणाले महाराष्ट्रात शिवसेना संपतेय, केवळ भाजप राहणार. याबाबत किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया देत थेट शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
किरीट सोमय्यांनी संजय राऊत यांच्या अटकेसंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, उद्धव ठाकरे पक्षप्रमुख असलेल्या शिवसेनेची महाराष्ट्रात दयनीय अवस्था आहे. हे अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री राज्यात मजबूत सरकार आहे, संजय राऊत यांच्यावर 3 क्रिमिनल केसेस आहेत. त्यातून त्यांची सुटका अवघड आहे.