Latest Marathi News

BREAKING NEWS

राज्यात दंगली घडवून सत्तेत येण्याचा उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न

0

नारायण राणे व त्यांचे दोन्ही पुत्र सतत उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करत असतात यापूर्वी सुधारणे कुटुंबीयांनी अनेकदा ठाकरे कुटुंबीयांवर निशाणा साधला होता आता पुन्हा एकदा आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे राणी कुटुंबीय आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात वाद होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. भाजपचे नेते नितेश राणे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत.

राणे म्हणाले की, राज्यात आज ज्या दंगली होत आहेत त्याचा मास्टर माईंड सिल्व्हर ओकमध्ये आलेला…(उद्धव ठाकरे) शरद पवार साहेबांच्या बाजूला बसला होता. कलानगर हा त्याचा पत्ता आहे… दंगली घडवून मुख्यमंत्री होण्याची स्वप्न आजही जिवंत आहेत. 1993 ला दंगली झाल्या आणि 1995 ला सत्ता आली. अशी उद्धवजींची धारणा आहे. 2004 ला झालेल्या बैठकीत माजी सरचिटणीस अरुण बेतकेकर उपस्थित होते. ते याबाबत पुष्टी देऊ शकतात. या दंगली मध्ये उद्धवजी मास्टर माईंड आहेत का? याची चौकशी व्हावी”, असं नितेश राणे म्हणाले आहेत.

पुढे बोलताना राणे म्हणाले की, ठाकरेगटाचे दोन नेते अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे एकमेकांचं तोंड बघत नव्हते. त्यांचे सूर मिळायला लागले आहे. ते आज पुन्हा एकत्र येत आहेत. हा दंगलीचा प्लॅन आहे का? मुसलमान समाजात दंगली घडवून आपला मतदान वाढवायचं हा उद्धवजींचा प्लॅन परत एकदा होतोय का? हे पवार साहेबांनी ओळखावं. त्र्यंबकेश्वर मंदिरात जबरदस्ती चादर टाकण्याचा प्रयत्न झाला. हट्ट धरतात. आधी महाराजांच्या गडकिल्ल्यावर अतिक्रमण सुरू केलं. आता तर धार्मिक स्थळाचा कब्जा घेण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.