बार्शी |
रविवार दिनांक ९ जुलै रोजी लायन्स क्लबचा बार्शी रॉयल चा पदग्रहण सोहळा मोरया हॉल येथे पार पडला. या कार्यक्रमासाठी बेळगाव होऊन आलेल्या PDG ला. मोनिका सावंत यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना शपथ दिली. अध्यक्ष म्हणून ला.राजेश खाडे,सचिव म्हणून ला. मनीष रूगले तर कोषाध्यक्ष म्हणून ला. शशिकांत बारबोले यांनी शपथ घेतली.
सोलापूर हुन आलेले VDG-1 ला. मल्लिनाथजी पाटील यांनी 4 नवीन सभासदांना शपथ दिली. या पदग्रहण सोहळ्यासाठी PDG जितेंद्र दोशी, झोन चेअरमन ला.अमर काळे ,सुनिल खाडे उपस्थित होते.याप्रसंगी मावळते अध्यक्ष ला.सौ. हेमल दोशी यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वांचे स्वागत केले, मावळत्या सचिवा ला.सौ वर्षा चांगभले यांनी मागील वर्षात केलेल्या कार्याचा आढावा दिला तर नूतन अध्यक्ष ला. राजेश खाडे यांनी येणाऱ्या वर्षात राबविल्या जाणाऱ्या सामाजिक कार्यक्रमांची माहिती दिली.ला.जितेंद्र दोशी यांनी बार्शी मध्ये परमनंट प्रोजेक्ट करावयाचा मानस व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या शेवटी नूतन सचिव मनीष रूगले यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ला. सुजाता मुथा व लायन तृप्ती दोशी यांनी केले. ह्या कार्यक्रमाला बार्शीतील प्रतिष्ठित नागरिक व लायन मेंबर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश भंडारी,राहूल दोशी,अमित कांकरिया,मंगेश बागुल, डॉ. निनाद माढेकर व सर्व लायन सभासदानी परिश्रम घेतले.