Latest Marathi News

BREAKING NEWS

जयंत पाटील यांना अजित पवार गटांमध्ये घेण्यासाठी हालचाली सुरू..?

0

मुंबई |

राष्ट्रवादीचे शरद पवार गट जयंत पाटील यांना आपल्या गटात खेचून आणण्याच्या हालचाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाने सुरू केल्या असल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भात प्राथमिक चर्चाही झाली असल्याचे समजते. पाटील यांनी या हालचालींना अद्याप अपेक्षित प्रतिसाद दिलेला नाही.शरद पवार यांच्या सोबतच राहण्याची भूमिका ते घेत आहेत तरीही त्यांचे मन वळविण्याचे पुरेपूर प्रयत्न केले जात असल्याचे सांगण्यात आले. पवार यांच्या बंडानंतर त्यांच्यावर टीका करत शरद पवार गटाचा किल्ला जयंत पाटील यांनीच लढवला होता.

राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार या दोघांच्या वेगवेगळ्या बैठकी झाल्या होत्या. वेळी शरद पवार यांच्यासोबत असलेले बरेच आमदार गेल्या आठ दिवसात अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत त्यात राजेंद्र शिंगणे मकरंद पाटील किरण लहामटे यांचा समावेश आहे. आशुतोष काळे परदेशात होते.परतल्यानंतर ते थेट अजित पवार यांच्या गटात गेले आहेत. अद्याप शरद पवार यांच्यासोबत असलेल्यांपैकी काही आमदार नक्कीच आमच्यासोबत येतील असा दावा अजित पवार गटाकडून केला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.