Latest Marathi News

BREAKING NEWS

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मजारीच्या ठिकाणी मुंबई महापालिकेचं अतिक्रमण विरोधी पथक दाखल

0

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल माहीमच्या वादग्रस्त मजारीचा व्हिडिओ दाखवत आणखी एक हाजीअली बांधण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला होता व या प्रकरणाकडे मुंबई मनपा दूरलासखा करत असल्याचा आरोपच त्यांनी लगावला होता अशातच आता या वादग्रस्त दर्ग्यावर कारवाई करण्यासाठी मुंबई महापालिकेचं अतिक्रमण विरोधी पथक दाखल झालं आहे.

आज सकाळी पालिकेचे अनेक कामगार आणि जेसीबी देखील माहीमच्या किनाऱ्यावर आणण्यात आलं आहे. दरम्यान, माहीममधील वादग्रस्त मजारीबद्दल माध्यमाला महत्त्वाची माहिती दिली आहे. कबर खूप जुनी असून, तिची नोंदही करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षात मजारीभोवती अनधिकृत बांधकाम करण्यात आलं आहे. केवळ हेच बांधकाम आज पाडण्यात येणार आहे. मजारीला हात लावला जाणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

माहीम समुद्रातील कथित मजारीचं मॅपिंग करण्यात आलं आहे. महाराष्ट्र मॅरिटाईम बोर्डाचे अधिकारी माहीम समुद्रातील ठिकाणावर पोहोचले आहेत. राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मॅरिटाईम बोर्डाला जाग आल्याचे बोलले जात आहे. माहीमच्या वादग्रस्त मजारीच्या ठिकाणी मुंबई महापालिकेचं अतिक्रमण विरोधी पथक दाखल झालं आहे.

तसेच एक जेसीबी देखील त्या ठिकाणी तयार ठेवण्यात आलं आहे. दरम्यान, माहीम समुद्रामधील या ठिकाणावर माहीम दर्गा ट्रस्टनं मोठा दावा केला आहे. ही जागा 600 वर्षं जुनी आहे. राज ठाकरे म्हणतात त्याप्रमाणं ती आताच बांधलेली नाही. मुळात, हजरत मकदूम अली शाह हे याच जागी बसून हजरत ख्वाजा खिजर अली शाह यांच्याकडून शिक्षण घ्यायचे. ही ऐतिहासिक जागा आहे. तिथं दर्गा उभारण्याचा आमचा कुठलाही विचार नाही, असं माहीम दर्ग्याचे विश्वस्त सुहेल खंडवानी यांनी सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.