महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी गुढीपाडवा मेळाव्यात माहीम दर्याच्या मागे बांधण्यात येत असलेल्या दर्याविषयी व्हिडिओ दाखवून थेट कारवाई करण्याची अग्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनपा आयुक्त चहल यांचाकडे कारवाईची मागणी केली होती तसेच सांगली येथील अनधिकृत मशिदीचा मुद्धा सुद्धा समोर आणला होता
या आरोपानंतर माहीम दर्ग्याच्या मागे असलेल्या मशिदीवर कारवाई करण्यात आली तर दुसरीकडे सांगली येथील अनधिकृत मशीद सुद्धा जमीनदोस्त करण्यात आली राज ठाकरे यांनी घेलतल्या या विषयाचे अनेकांनी कौतुक केले होते तर अनेकांनी यावर संताप व्यक्त करत दोन धर्मात तेढ निर्माण करत असल्याचा आरोप राज ठाकरेंवर लगावला होता अशातच आता दुसरीकडे राज ठाकरे यांच्या भाषणाविरोधात पुणे शहरात आधी तक्रार दाखल करण्यात आली, त्यानंतर आता कोर्टातही तक्रार अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
राज ठाकरे यांच्या भाषणाविरोधात पिंपरी चिंचवडच्या वाकड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दाखल केल्यानंतर आता वाजिद सय्यद यांनी पिंपरीच्या मोरवाडी कोर्टातही राज ठाकरे यांच्या विरोधात अर्ज दाखल केला आहे. राज ठाकरे यांच्या भाषणांमुळे मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्याचं त्याचबरोबर हिंदू मुस्लिम संघर्ष उभा राहण्याची शक्यता असल्याचा आरोप सय्यद यांनी या अर्जात केला आहे. यावर मनसे कार्य प्रतिक्रिया देते हे पाहावे लागणार आहे.