रायगड : नैराश्यातून कसे शब्द बाहेर पडतात हे आता अनंत गीते यांच्या मुखातून जनतेला ऐकायला मिळत आहेत. आपल्यावर कोरोनाची महामारी आली त्यावेळी हेच अनंत गीते कुठे होते असा संतप्त सवाल करतानाच संकटाच्या काळात संवेदना असाव्या लागतात. मानवता वादातून प्रत्येकाकडे बघायचे असते मात्र हेच अनंत गीते विसरले, अशी टीका महायुतीचे रायगडचे उमेदवार सुनील तटकरे यांनी केली.
माणगाव खरवली येथे महायुतीचा कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना तटकरे बोलत होते.
पुढे बोलताना तटकरे म्हणाले, जन्माने मी गवळी समाजाचा असलो तरी नशीबाने मी कुणबी बांधवांचा आहे याचा मला अभिमान आहे. काबाडकष्ट करणार्या लोकांच्या पाठीमागे भक्कमपणे महायुतीचे सरकार उभे राहिले आणि यापुढेही राहील, असे आश्वस्त केले.
या तालुक्यासह जिथे दूरध्वनीची समस्या भेडसावत आहे अशा सर्व खेड्यापाड्यात येत्या सहा महिन्यात खासदार फंडातून ४ जीचे नेटवर्क उभे केल्याशिवाय थांबणार नाही. या भागातील तरुण वर्ग शेतीकडे वळला पाहिजे. या गावात कलिंगडाची शेती मोठया प्रमाणात होते यावर येत्या कालावधीत नक्कीच काम केले जाईल, असा शब्द तातकारे यांनी यावेळी दिला.
माझ्या मतदारसंघातील खेड्यापाड्यातील सगळ्या गावांची नावे सांगतो मात्र अनंत गीते यांनी खेड्याचे नको तालुक्यातील एका गावाचे नाव सांगितले तरी ते या मतदारसंघात काम करत होते हे मान्य करेन असे आव्हानच दिले. माणगाव तालुक्यात कुणबी समाजासाठी भवन करण्याचा प्रयत्न केला त्यात माझा खारीचा वाटा आहे हेही तटकरे यांनी आवर्जून सांगितले.
या मेळाव्याला शिवसेना मुख्य प्रतोद आमदार भरतशेठ गोगावले, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या सायली दळवी, आदींसह महायुतीचे तालुकाध्यक्ष, तालुकाप्रमुख आणि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित