Latest Marathi News

BREAKING NEWS

“तटकरे यांना पुन्हा खासदार करण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी झपाटून कामाला लागा” अदिती तटकरे यांचे आवाहन

0

रायगड : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे रायगड लोकसभेचे उमेदवार सुनील तटकरे यांचा सध्या जोरात प्रचार सुरू आहे. तटकरे यांना विजयी करण्यासाठी मंत्री अदिती तटकरे देखील मैदानात उतरल्या आहेत. सध्या अदिती तटकरे कोपरा सभा, गावभेटी, तसेच मेळावे घेऊन महायुतीच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना तसेच मतदारांना तटकरे यांच्या विजयी करण्याचे आवाहन करतांना दिसत आहेत.

सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी अदिती तटकरे यांनी महाड तालुक्यात संवाद मेळाव्यात संवाद साधला. यावेळी सुनील तटकरे यांना प्रचंड मतांनी पुन्हा निवडून आणण्याचा निर्धार करावा. त्यासाठी महायुतीच्या सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी झपाटून काम करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले आहे.

दरम्यान, अदिती तटकरे यांच्यासह या मेळाव्यासाठी आमदार भरतशेठ गोगावले, युवासेना कोअर कमिटी सदस्य विकास गोगावले, महाड विधानसभा संघटक एकनाथ सुकूम, महाड तालुका संपर्क प्रमुख इक्बाल चादले, महाड तालुका सहसंपर्क प्रमुख प्रमोद गोगावले,समीर रेवाळे, महाड तालुका महिला संपर्क प्रमुख सुनंदा कदम, युवासेना महाड तालुका संपर्क प्रमुख सचिन राणे, महाड तालुका महिला सहसंपर्क प्रमुख उत्कर्षा पवार, युवासेना महाड तालुका सहसंपर्क प्रमुख राहूल गायकर यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.