Latest Marathi News

BREAKING NEWS

“अर्चना पाटलांना औसा अन् उमरग्यातून १ लाखापेक्षा अधिक मताधिक्क देऊ”,सुरेश बिराजदारांनी दिला शब्द

0

धाराशिव : महायुतीत झालेल्या वाटाघाटीत धाराशिव लोकसभेची जागा आपल्याकडे येणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश अजितदादांनी दिले. आपल्याकडे ना खासदार नान आमदार ना खुर्ची असे असताना मतदारसंघात फिरल्याचा सकारात्मक प्रतिसाद बघायला मिळाला. लोकांच्या भावना कळून त्यातून जनमत तयार व्हायला लागलं. तेव्हा उमेदवार बदलला गेला तरी काही हरकत नाही. असे म्हणत आता महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना औसा, उमरग्यातून १ लाखापेक्षा अधिक मताधिक्क मिळवून देणार असा विश्वास राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेते सुरेश बिराजदार यांनी व्यक्त केलाय.

पुढे बोलतांना सुरेश बिराजदार म्हणाले की, अजित पवारांनी सांगितलं होतं की धाराशिव लोकसभेतून अर्चना पाटील यांना उमेदवारी द्यायची आहे. त्यावर आमची काहीही हरकत नसल्याचे अजितदादांना सांगितले. आम्ही जी तयारी केली होती. आता तीच तयारी अर्चना पाटलांसाठी काम करू. त्यामुळे आता अजितदादांनी आम्हाला आदेश दिला आहे. त्याचं पालन करावचं लागणार आहे. असं म्हणत अजितदादांचं नेतृत्व आता महाराष्ट्राला हवं आहे. त्यामुळे आम्हाला काम करावंच लागेल असेही ते म्हणाले.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, अर्चनाताईंना एक लाखापेक्षा लीड मिळणार. शेजारच्या औसामध्ये देखील निवडणुकीबाबत चांगलं वातावरण आहे. त्याठिकाणी त्यांचा उस आमच्या साखर कारखान्यांवर येतो. तेथे सुद्धा अभिमन्यु पवार, बसवराज पाटील आहेत. त्याठिकाणी राणादादांच्या नेतृत्वाखाली मला जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचा चेअरमन केलं. संचालक मंडाळाने हा सारख कारखाना परत एकदा सुरू केला. राणा दादांचे पुण्या या शेतकऱ्यांच्या रूपाने आम्हाला मिळणार आहे. असेही ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.