Latest Marathi News

BREAKING NEWS

“आता गीते लोकसभेची तर सोडाच साधी ग्रामपंचायतची निवडणूक देखील जिंकू शकत नाहीत;” शिवसेना नेते योगेश कदम

0

रायगड: लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटाचे नेते पुन्हा एकदा आमने – सामने आल्याचे दिसते. रायगड लोकसभा मतदार संघात ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीते यांना शिवसेना नेत्यांनी टार्गेट केले असून मागील निवडणूकीत ज्यांच्या पैशांवर तुम्ही निवडून आलात, त्यांचा पैसा आता पापाचा कसा झाला ?.  असा सवाल उपस्थित करत शिवसेना नेते योगेश कदम यांनी गीते यांना चांगलेच फटकारले आहे. 

योगेश कदम म्हणाले, मागील लोकसभेच्या निवडणुकीमध्ये  कदम घरण्यामुळे आणि शिवसेनेमुळे अनंत गीत खासदार झाले. आज ते पापाचा पैसा म्हणत आहे परंतु आमच्यात पैशाच्या जोरावर ते 2019 सालच्या निवडणुकीत जिंकून आले. संपूर्ण रायगड मतदारसंघातील सर्वात जास्त लीड हे आम्ही त्यांना दापोली मतदारसंघातून मिळवून दिले होते. आता गीते लोकसभेची तर सोडाच साधी ग्रामपंचायतची निवडणूक देखील जिंकू शकत नाहीत. आता ही निवडणूक ते दीड ते दोन लाखांच्या फरकाने 100 टक्के हारणार आहे. हा पराभव त्यांना दिसत आहे.  म्हणून ते बेताल वक्तव्य करत आहेत.

गितेंना रायगड लोकसभा मतदारसंघात मत मागण्याचा अधिकार नाही असे सांगताना योगेश कदम म्हणाले, रायगड मतदारसंघ गीते यांनी भकास केला आहे. 36 वर्षे खासदार असून एकही उद्योग जिल्ह्यात आणला नाही . रोजगाराचा प्रश्न सोडवता आला नाही.  कुणबी समाजाच्या नावावर ते मत मागत आहेत, तोच कुणबी समाज त्यांना लाथ मारुन बाहेर काढेल. 

दरम्यान, रामदास कदमांनी खेड तालुक्यासाठी काय केले हे खेड तालुक्यातील जनता जाणते. येत्या 26 तारखेपासून सुरु होणाऱ्या मेळाव्यातून अनंत गितेंना चोख उत्तर दिले जाणार आहे, असेही योगेश कदम यांनी सांगितल.

Leave A Reply

Your email address will not be published.