Latest Marathi News

BREAKING NEWS

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील विमाननगर परिसरात आयोजीत भव्य शोभायात्रेत चंद्रकांत पाटील यांनी घेतला सहभाग

0

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील विमाननगर परिसरात भव्य शोभायात्रेत सहभाग घेतला.

चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तक्षशिला प्रतिष्ठान आणि राहुल भंडारे यांच्या वतीने पुण्यातील विमाननगर परिसरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत पाटील यांनी सहभागी होऊन, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. तसेच, सर्व भीम अनुयायांना जयंतीच्या शुभेच्छाही दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.