Latest Marathi News

BREAKING NEWS

पुणे शहरात दहशतवाद्यांची साखळी कार्यरत असल्याची खुद्द पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

0

पुणे । पुणे शहरात मागच्या महिन्यात दोन दहशतवाद्यांना अटक केले. त्यापूर्वी मुंबई अन् पुणे शहरात ३ जुलै रोजी काही जणांना अटक केली होती. यानंतर पुणे शहर दहशतवाद्यांचे केंद्र झालय का? अशी प्रकरणे उघड होऊ लागली. दहशतवादी प्रकरणाचा तपास एटीएस आणि एनआयएने केला. त्यानंतर आता पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रथमच या प्रकरणावर जाहीरपणे मत मांडले. पालकमंत्र्यांनी पुणे शहरात दहशतवाद्यांची साखळी कार्यरत असल्याची कबुली दिली.

पुणे शहरात दहशतवाद्यांची मोठी साखळी आहे. या संदर्भात मला माहिती जाहीर करण्यास मर्यादा आहेत. परंतु पुण्यात अतिरेक्यांची मोठी लिंक सापडली आहे. मी कमी बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. आपणास सर्वांना हदरा बसेल, आपली झोप उडेल, अशी मोठी लिंक दहशतवाद्यांची आहे अशी खळबळजनक माहिती पालकमंत्री पाटील यांनी दिली.

पुढे ते म्हणतायत की, या दहशतवाद्यांचे धागेदोरे कुठे कुठे जात आहेत, ते जाहीरपणे सांगण्यास मर्यादा आहेत. पोलिसांनी त्यांना पकडले. त्यावेळी त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. तिसरा साथीदार फरार झाला. परंतु दोघांना पोलिसांनी पकडले. या संदर्भात तपासातून उघड झालेल्या माहितीमुळे आपली सर्वांची झोप उडेल, अशी ही साखळी आतापर्यंत तपासातून उघड झाली आहे.

आयएस या दहशवादी संघटनांशी पुण्यातील दहशतवाद्यांचे संबंध समोर आले आहे. तसेच हे दशतवादी स्टुडंट इस्लामिक मुव्हेमेंट ऑफ इंडिया म्हणजेच सिमी आणि इंडियन मुजाहिदीन या बंद पडलेल्या संघटनांचे पुनर्जीवन करत होते, हे तपासातून समोर आले आहे. या संघटनांना विदेशातून फंडीग मिळत आहे.

अजित पवारांच्या त्या तिखट प्रश्नामुळे शिंदे गटात अस्वस्थता’ थेट भाजपा मंत्र्याला करणार तक्रार

सिनेटच्या निवडणुकांसाठी अर्ज स्वीकारले, मग छाननी का नाही? युवासेना आक्रमक

Leave A Reply

Your email address will not be published.