मुंबई |
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस कायम चर्चेत असतात. कधी ट्विट तर कधी एखाद्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अमृता फडणवीस वादाच्या भोवऱ्यात असतात. पण आता त्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आल्या आहेत. कारण आहे संगीत… दिवाळीच्या मुहूर्तावर अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. त्यांनी स्वत: ट्वीट करत याबद्दलची माहिती दिली आहे.
“दिवाळी 2022 आणि लक्ष्मी पूजेच्या शुभप्रसंगी माझी लक्ष्मी मातेसाठीची आरती ऐका आणि देवीच्या भक्तीत तल्लीन व्हा, प्रेम से बोलो, ॐ जय लक्ष्मी माता…!” असे कॅप्शन त्यांनी या ट्वीटला दिले आहे. अमृता फडणवीस यांनी गायलेले हे गाणे सध्या प्रचंड चर्चेत आहे.
सध्या सर्वत्र अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याची चर्चा आहे. युट्यूबवर त्यांच्या नव्या गाण्याला दिवाळीच्या मुहूर्तावर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. शिवाय अनेकांनी कमेंट करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.