Latest Marathi News

BREAKING NEWS

पवारांच्या दौऱ्यापूर्वी राष्ट्रवादीची जम्बो कार्यकारिणी, 42 प्रभागाध्यक्षांच्या निवडी

0

बार्शी |

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे 27 ऑक्टोबर रोजी बार्शीत येत आहेत. शरद पवार यांच्या बार्शी दौऱ्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसची जम्बो कार्यकारिणी जाहीर झाली आहे. शहरातील सर्वच नवीन प्रभाग अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये, वरिष्ठ आणि युवक अध्यक्षांची कार्यकारिणी असून एकूण 42 जणांची त्यासाठी निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये, स्वतः कृष्णराज बारबोले हे प्रभाग क्रमांक 7 म्हणजेच राऊत चाळ परिसरातील प्रभागाचे काम पाहणार आहेत.

माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर युवा नेते कृष्णराज बारबोले हे तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद वाढवताना दिसत आहे. यापूर्वी जिल्हा, तालुका आणि शहरातील पदाधिकारी यांच्या निवडी झाल्यानंतर आता प्रभाग अध्यक्षांच्या निवडीझाल्या आहेत. कृष्णराज बारबोले आणि विक्रमसिंह पवार हे प्रभाग क्र. 7 चे काम पाहणार आहेत. नव्याने एकूण 42 निवडी होत असून यापूर्वी 12 पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या आहेत. त्यामुळे, बारबोले हळूहळू आपले पक्ष संघटन वाढवत असल्याचे दिसून येते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बार्शी शहर #प्रभाग अध्यक्ष वरिष्ठ समिती :-

1)रवि मसके 2)दिपक दरेकर 3)महादेव गायकवाड 4)निलेश खुडे 5)दादासाहेब चोबे 6)प्रकाश सुपेकर 7)कृष्णराज बारबोले 8)ऋषिकांत पाटील 9)शरद सावळे 10)जाकिर शेख 11)औदुंबर गुळमे 12)रामराजे बारंगुळे 13)सद्दाम मुल्ला 14)रामराजे पवार 15)इमरान मुल्ला 16)बाळासाहेब गंजे 17)शुभम बोधले 18)जगन्नाथ साळुंखे 19)चंद्रकांत बोकेफोडे 20)प्रसाद वठारे 21)राजेंद्र सुरवसे

राष्ट्रवादी युवक काँग्रेस बार्शी शहर प्रभाग अध्यक्ष युवक समिती –

1)विजय घोडके 2)बप्पा व्हळे 3)आनंद ईटकर 4)कृष्णा रंदिवे 5)फैजान जीकरे 6)रवि घोलप 7)विक्रमसिंह पवार 8)प्रथमेश भोंडवे 9)अकबर सय्यद 10)सोमनाथ गोसावी 11)प्रसाद वठारे 12)अतुल साळुंखे 13)पंकज जगदाळे 14)रणजित लांडगे 15)अभिजीत भालके 16)सुरज शिंदे 17)अनिल थोरात 18)रोहित 19)सोमेश पवार 20)सुलेमान अत्तार 21)किरण मोरे

Leave A Reply

Your email address will not be published.