Latest Marathi News

BREAKING NEWS

प्राणवायू लावला तरी आता ते जाणार आणि महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री मिळणार

0

एकीकडे आज महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळाचा विस्तार पडला असून दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी थेट शिंदे गटावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह १६ आमदार शंभर टक्के अपात्र ठरणार आणि महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री मिळणार अशा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, तुम्ही किती वाचवायचा प्रयत्न केला आणि त्यांना प्राणवायू लावला तरी आता ते जाणार जाणार आणि जाणार आणि महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री मिळणार असे सूचक विधान त्यांनी केले आहे तसेच यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या बद्दल त्यांनी सूचक विधान केले आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबाबत बोलताना राऊत म्हणाले, अभ्यास किती काळ करायचा? त्याला काही मर्यादा आहेत. जर ढ विद्यार्थी असेल वर्षानुवर्षे एकाच वर्गात बसलेला असतो. पण आपण स्वत: वकील आहात, आपल्याला कायदा कळतो. ज्या पक्षामध्ये आपण आहात तो कायदा मानत नाही हे देशाला माहिती आहे. तो पक्ष अजिबात कायदा मानत नाही, संविधान मानत नाही, नितिमत्ता माहीत नाही. पण आपल्याला अनेक पक्षांचा अनुभव असल्याने कायदा माहिती आहे.

पुढे बोलताना राऊत म्हणाले, आपण शिवसेनेचे वकील होता. सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलंय, हे आपल्याला चांगलं माहिती आहे. त्यामुळे आपण कितीही टंगळमंगळ केली तरी निर्णय घ्यावा लागेल. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह 16 आमदार शंभर टक्के अपात्र ठरणार.

तुम्ही किती वाचवायचा प्रयत्न केलात, त्यांना प्राणवायू लावलात, अमरत्वाची इंजेक्शन दिले तरी ते आता शक्य नाही. ते जाणार आणि महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री मिळणार असे संजय राऊत म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.