मुंबई: गेली २५ वर्षे पोलीस खात्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे पोलीस निरीक्षक अजय रामदास जोशी यांना राष्ट्रपतींच्या पोलीस मेडल जाहीर झाले आहे. दरवर्षी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलिसांना राष्ट्रपतींच्या मेडलने सन्मानित केले जाते.
पोलीस निरीक्षक अजय जोशी हे सध्या मुंबई आर्थिक गुन्हे शाखेत कार्यकर्त आहेत. गेली २५ वर्षापासुन ते पोलीस खात्यात सेवेत आहेत. आजवर अतिरेकी विरोधी कारवाई पथक, गुन्हे शाखा या ठिकाणी त्यांनी संवेदनशील आशा गुन्ह्यांचा छडा लावण्याची कामगिरी पार पाडली आहे. त्यांना गुणवंत पोलीस अधिकारी म्हणून हे पदक जाहीर करण्यात आले आहे.
15 वर्षे उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तसेच गुन्हे तपासात अत्यन्त मोलाची भूमिका पार पाडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना आशा पदकाने सन्मानित करण्यात येते. श्री अजय जोशी च्या या सन्मानाबद्दल त्यांचे सर्व थरातून कौतुक केले जात आहे.