बा विठ्ठला, कोरोना ला हद्दपार कर.
पंढरपूर : यावर्षी लाखो भाविक आषाढीवारीपासून वंचितत राहणार आहेत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील काल विठ्ठलाकडे साकडे घालणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी वारकऱ्यांना असा विश्वास दिला आहे की, “मी तुमचा प्रतिनिधी म्हणून विठ्ठलाकडे जगाला कोरोना मुक्त करण्याचे साकडे घालणार आहे.
त्याचबरोबर पंढरीत न येताही वारकऱ्यांनी कोरोना संकटातून मुक्ती देण्याचे साकडे विठ्ठलाला घातले आहे बा विठ्ठला, कोरोनाला हद्दपार कर, अशी श्रद्धापूर्वक याचना विठुराया कडे केली आहे. वारकऱ्यांची उपस्थिती पंढरीत नसली तरी त्या परिसराचे दर्शन प्रसारमाध्यमे आपापल्या पद्धतीने घडवीत आहेत. मंदिर समितीने मोठ्या कल्पकतेने मंदिर परिसर सजविला आहे. खास विठुरायाच्या भक्तगणांसाठी आम्ही आपल्या पुढ्यात ठेवत आहोत.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आषाढी यात्रा २०२० निमित्त श्री विठ्ठल सभामंडप रुक्मिणीमाता सभामंडप नामदेव पायरी व मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे…. खालील लिंक वर क्लिक करून पहा विठ्ठल मंदिराच्या रोषणाईची छायाचित्रे