Latest Marathi News

BREAKING NEWS

‘पठाण’चा सर्वत्र बोलबाला; किंग खानने असे मानले चाहत्यांचे आभार

0

चित्रपट गृहात आजही किंग खानच्या ‘पठाण’ चित्रपटाचा जलवा आजही कायम आहे. या चित्रपटाने सुपरहिट, ब्लॉकबस्टरचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. पाचव्या दिवशी या चित्रपटाने तब्बल 65 ते 70 कोटींचा बिझनेस केला आहे. तर एकूण कलेक्शनचा विचार केल्यास, या चित्रपटाने आत्तापर्यंत 290 कोटींच्या आसपास कमाई केली आहे. या चित्रपटाला प्रदर्शनापूर्वीच मोठा विरोध झाला, त्याविरोधात बॉयकॉटचा ट्रेंड चालला, मात्र किंग खानच्या चाहत्यांनी सर्व विरोध झुगारून चित्रपटाला अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे.

चित्रपटगृहांमध्ये चाहते किंग खानच्या गाण्यांवर बेभान होऊन नाचताना दिसतायतं. तर कुठे पोस्टर्स झळकवत शाहरुख खानवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. चित्रपटाला चाहत्यांकडून मिळालेल्या यशामुळे आणि प्रेमामुळे किंग खान भलताच खुश झाला आहे. यामुळे त्याने चाहत्यांचे खास आभार मानले आहेत.किंग खानने रविवारी आपल्या मुंबईतील मन्नत या बंगल्याच्या बाल्कनीत येत चाहत्यांना स्पेशल सरप्राईज दिलं.

शाहरुखने चक्क बाल्कनीत उभं राहून पठाण चित्रपटातील ‘झुम जो पठाण’ या गाण्यावर ठेका धरला. तर खाली उभ्या असलेल्या चाहत्यांचे त्याने फ्लाइंग किस करत आभार व्यक्त केले, यावेळी शाहरुख खान जबरदस्त आनंदात दिसला. त्याने आपली सिन्गेचर पोज देत चाहत्यांना देखील खूश केलं, यावेळी बंगल्यासमोर उभे असलेले किंग खानच्या चाहत्यांनी देखील त्याच्यासोबत डान्स केला. किंग खानने चाहत्यांच्या मानलेल्या आभाराचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.