Latest Marathi News

BREAKING NEWS

धीरेंद्र शास्त्रींच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर रोहित पवार संतापले

0

बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांना अनिस यांनी दिलेल्या आवाहनानंतर चांगलेच चर्चेत आहेत. सुरुवातीला धीरेंद्र शास्त्री यांना मिळालेल्या आव्हानामुळे ते चर्चेत आले होते.आता पुन्हा एकदा संत तुकाराम महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे शास्त्री चर्चेत आले आहेत. ‘संत तुकाराम महाराज यांना त्यांची पत्नी रोज मारहाण करायची’ असं विधान शास्त्रींनीं केल्यानंतर आता राजकीय वर्तुळातून यावर प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. यावर आता आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रोहित पवार म्हणाले, “बागेश्वर बाबाने जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबारांयांबद्दल गरळ ओकली असताना राज्याचं पालकत्व ज्यांच्याकडं आहे ते मात्र शांत आहेत. या बाबाची बडबड एकवेळ मध्यप्रदेशात खपेल पण भक्ती-प्रेमाची शिकवण देणाऱ्या संतांबाबत आणि वारकरी संप्रदायाबद्दल बोललेलं महाराष्ट्र कदापि खपवून घेणार नाही.” असं रोहित पवार म्हणाले. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीशी यावेळी ते सवांद साधत होते.

धिरेंद्र शास्त्री म्हणाले की, “संत तुकाराम महाराज महाराष्ट्रातील एक महात्मा आहेत. त्यांची पत्नी त्यांना रोज मारायची. याच कारणामुळे त्यांना एका व्यक्तीने विचारले की तुम्ही तुमची पत्नी तुम्हाला रोज मारहाण करते, मग तुम्हाला वाईट वाटत नाही का? असं त्यांना विचारण्यात आलं होत. या प्रश्नाचे संत तुकाराम महाराजांनी उत्तर दिले.

ते म्हणाले की, ‘देवाची कृपा आहे की मला मारहाण करणारी पत्नी मिळाली. माझ्या पत्नीने माझ्यावर प्रेम केले असते तर मी देवाच्या प्रेमात पडलोच नसतो. मी पत्नीच्याच प्रेमात गुरफटून गेलो असतो. मला मारहाण करणारी बायको मिळाली आहे, त्यामुळे मला प्रभू राम यांची भक्ती करण्याची संधी मिळते, असे संत तुकाराम महाराज म्हणाले होते’. असे धीरेंद्र कृष्ण महाराज म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.