मुंबई महानगर पालिका निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे अशातच काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी हे मुंबई दौऱ्यावर आले होते या दौऱ्यादरम्यान त्यांनी विविध विकास कामांचा शुभारंभ केला होता तसेच थेट शिंदे-फडणवीस सरकारच्या हातात यंदा मुंबई मनपा सोपविण्याचे तसेच मुंबईच्या विकासाला हातभार लावण्याचे आवाहन त्यांनी मुंबईकरांना केले होते त्यात आता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १० फेब्रुवारी रोजी मुंबई दौऱ्यावर येणार असल्याचे वृत्त समोर येत आहे.
याच पार्श्वभूमीवर मुंबई चोक बंदोबस्त ठेवण्यात आला असून मुंबई पोलिसांकडून शहराच्या सुरक्षामध्ये वाढ करण्यात आली आहे. ताईच विमानतळ परिसरासह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक (सीएसएमटी), कुलाबा आणि अंधेरी परिसरात ड्रोन उडविण्यास बंदी घालण्यात आली असून पॅरा ग्लायडिंग, रिमोट कंट्रोल्ड मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, सर्व प्रकारचे फुगे, पतंग, आदींच्या उडविण्यावर मुंबई पोलिसांनी बंदी घालली आहे. फौजदारी दंड प्रक्रिया संहितेच्या कलम १४४ अंतर्गत याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
पंतप्रधानांच्या दाैऱ्यावेळी होणाऱ्या गर्दीला टार्गेट करून कोणतीही अनुचित घटना रोखण्यासाठी पोलिसांनी आवश्यक त्या सुरक्षा तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. सोबतच शहराच्या प्रवेशद्वारांसह महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करून संशयित वाहने, व्यक्ती आणि सामानांची श्वानपथक, बाॅम्ब शोधक व नाशक पथक, मेटल डिटेक्टर आणि अन्य अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने तपासणी करण्यात येत आहे. नरेंद्र मोदी कुलाबा येथे आयएनएस शिक्रा, मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनन्स, तसेच मरोळ, अंधेरी परिसरात उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी राहू नयेत यासाठी मुंबई पोलिस केंद्रीय गुप्तचर यंत्रणांसोबत समन्वय साधून बंदोबस्ताची आखणी करत आहेत.