Latest Marathi News

BREAKING NEWS

पंतप्रधान नरेंद्र मोदीं आज मुंबई दौऱ्यावर वाहतुकीत मोठा बदल;

0

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर या दोन वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. तसेच ते बोहरा मुस्लीम समाजाच्या मरोळ येथील अलजेमा-तूस-सफिया संकुलाचे देखील उद्घाटन करणार आहेत. यासोबतच त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन होणार आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्य मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.

मात्र या वाहतुकीमध्ये करण्यात आलेल्या बदलाचा सामान्य नागरिकांना कुठेही फटका बसणार नाही याची काळाजी घेण्यात आली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त मुंबईच्या वाहतुकीमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. ईस्टर्न एक्स्प्रेस वरील वाहतूक दुपारी दोन ते चार दरम्यान बंद असणार आहे. त्यामुळे या मार्गिकेवरील वाहतूक दुसऱ्या मार्गावर वळवण्यात आलेली आहे. याचबरोबर नेव्ही नगर, बधवार पार्क, कफ परेड विभागातली वाहतूक मंत्रालयाच्या दिशेने वळवण्यात आली आहे.

वाहतुकीमध्ये करण्यात आलेल्या बदलाचा सामान्य नागरिकांना कुठेही त्रास होणार नाही याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सीएसएमटी परिसरात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. मोदींच्या हस्ते आज वंदे भारतला हिरवा झेंडा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते आज मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर या दोन वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. तसेच ते बोहरा मुस्लीम समाजाच्या मरोळ येथील अलजेमा-तूस-सफिया संकुलाचे देखील उद्घाटन करणार आहेत. यासोबतच ते मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या वाकोला ते कुर्ला उन्नत मार्ग आणि एमटीएनएल जंक्शन ते एलबीएस उड्डाणपूलाचं देखील उद्घाटन करणार आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.