Latest Marathi News

BREAKING NEWS

“पुण्यामध्ये मराठी चित्रनगरी उभारण्यासाठी सांस्कृतिक विभागाने पुढाकार घ्यावा…! – चंद्रकांतदादा पाटील

0

पुणे |

पुण्याची ओळख सांस्कृतिक शहरासह मराठी चित्रसृष्टीची जन्मभूमी अशी आहे. त्यामुळे येथे मराठी चित्रनगरी उभारण्यासाठी सांस्कृतिक विभागाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे केली.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे. सगळ्या प्रकारच्या कलेचे अविष्कार येथे होतात. मुंबई ही हिंदी चित्रपटाची जन्मभूमी, कर्मभूमी मानली जाते त्याचप्रमाणे पुण्याला मराठी चित्रपटाची जन्मभूमी मानली जाते. त्यामुळे कोल्हापूरप्रमाणे पुण्यात उत्तम दर्जाचा चित्रनगरी निर्माण करण्याची सांस्कृतिक कार्य मंत्र्यांकडे मागणी केली आहे. या चित्रनगरीच्या माध्यमातून पुण्यात अनेक चांगले चित्रपट निर्माण होतील, असे त्यांनी सांगितले.

मुकुंदनगर थिएटर अकॅडमी येथे आयोजित २१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव समारोप व पुरस्कार वितरण प्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ दिग्दर्शक पद्मभुषण जानु बर्मा, अभिनेत्री पद्मश्री विद्या बालन, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.