Latest Marathi News

BREAKING NEWS

पाणीकोंडीने पाकिस्तान बिथरला

0


इस्लामाबाद : वृत्तसंस्था
काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलली असून, त्याचाच एक भाग म्हणून सिंधू नदी कराराला स्थगिती दिली. त्यामुळे पाकिस्तान चांगलाच बिथरलेला आहे. पाणी तोडणे ही युद्धकृती असल्याचे पाक मंत्र्यांनी म्हटले. आता पाक पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी भारताच्या राजनैतिक कारवाई विरोधाचा सूर लावला. भारताने पाणी अडवले तर संपूर्ण ताकदीनिशी प्रत्युत्तर देऊ, असा इशारा शहाबाज शरीफ यांनी दिला. आता त्यांनी भारताविरुद्ध गरळ ओकायला सुरुवात केली आहे.


लष्कराच्या कार्यक्रमात शहाबाज शरीफ बोलत होते. भारताच्या हालचाली लक्षात घेऊन आता संभाव्य हल्ल्याच्या भीतीने उलट्या बोंबा सुरू केल्या आहेत. पंतप्रधान आणि लष्कर प्रमुखांच्या बेताल वक्तव्यांमधून पाकिस्तानची बेचैनी दिसून येत आहे. सिंधू नदीचे पाणी अडवल्यामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा कणा मोडला जाणार आहे. पाकिस्तानला शांतता हवी आहे पण ही इच्छा आमचा कमकुवतपणा मानू नये. सिंधू नदीचे पाणी थांबवले तर आम्ही पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देऊ असे शहाबाज शरीफ म्हणाले.

भारताला धमक्या
पहलगाम हल्ल्यात इस्लामाबादच्या भूमिकेबाबत भारताच्या आरोपांवर पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी भारताचे सर्व आरोप फेटाळून लावत हे कोणत्याही विश्वासार्ह तपास व पुराव्याशिवाय केले गेले असल्याचे म्हटले. पहलगाम हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाºया लष्कर ए तोयबाची छाया असणाºया द रेजिस्टन्स फोर्सचे म्होरके पाकिस्तानात मोकाट फिरत आहेत. यावेळी पाकिस्तानी पंतप्रधानांनी भारताला त्यांचा देश कोणत्याही परिस्थितीसाठी तयार असल्याची धमकी दिली. इस्लामाबाद कोणत्याही तटस्थ पारदर्शक चौकशीत सहभागी होण्यास तयार आहे परिस्थिती काहीही असो त्यांचा देश कधीही आपल्या सन्मानाची तडजोड करणार नाही. पाकिस्तानने जोरदार प्रत्युत्तर देऊन आपली लष्करी क्षमता आधीच सिद्ध केली आहे. भविष्यात होणाºया कोणत्याही दुर्दैवी घटनेला अशाच प्रकारची प्रतिक्रिया मिळेल अशी धमकीही त्यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.