कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या २२४ जागांसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. पहिल्या कलामध्ये काँग्रेसला बहुमत मिळाले आहे. काँग्रेसने पहिल्या कलात ११५ जागांवर आघाडी घेतली आहे. तर भारतीय जनता पार्टी अवघ्या ८२ जागांवर आघाडी घेतली आहे. जेडीएसने १५ जागांवर आघाडी घेतली आहे. तर इतरांनी तीन जागांवर आघाडी घेतली आहे. पहिल्या कलात काँग्रेसने बहुमतासाठीचा आकडा पार केल्याने कर्नाटकात किंगमेकर होण्याचं जेडीएसचं स्वप्न भंगलं आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सकाळी 8 वाजता सुरू झाली. आधी पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. त्यानंतर ईव्हीएम मशीन उघडण्यात आल्या. त्यानंतर अवघ्या ४५ मिनिटातच पहिल्या फेरीचे कल समोर आले आहेत. या कलामध्ये काँग्रेसला प्रचंड आघाडी मिळाली आहे. काँग्रेसने बहुमतासाठीचा आकडाही पार केला आहे. दुपारपर्यंत असंच चित्र राहिलं तर कर्नाटकात काँग्रेसचीच सत्ता येईल असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
राज्यात बहुमतासाठी ११३ जागा आवश्यक आहे. पहिल्या कलात काँग्रेसने ११५ जागांवर आघाडी घेऊन बहुमताचा आकडा पार केला आहे. तर भाजप ८२ आणि जेडीएस १५ जागांवर आघाडीवर आहे. इतरांनी तीन जागांवर आघाडी घेतली आहे. कल हाती येताच काँग्रेसने ट्विट करून भाजपवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. कर्नाटकात काँग्रेसचा विजय रथ कोणी रोखू शकत नाही, असं काँग्रेसने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.