Latest Marathi News

BREAKING NEWS

निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशीच्या मागणीला पाठींबा द्या; शेलारांचे आदित्य ठाकरेंना आव्हान

0

आदित्य ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला उत्तर देत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी पलटवार केला.ते पुढे म्हणाले की, पेंग्विन सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची आजची पत्रकार परिषद ऐकून पेंग्विनने डोक्याला हात मारला असता. आदित्यजी तुम्ही मुख्यमंत्र्यांकडून पत्रकार परिषद आणि प्रश्नांच्या उत्तराची अपेक्षा धरत आहे विसरलात का? अडीच वर्ष आपले पिताश्री मुख्यमंत्री होते. त्यांनी ना विधानसभेत एका प्रश्नांच उत्तर दिलं ना विधानसभेच्या बाहेर कधी पत्रकार परिषद घेतली. आपले पिताश्री मुख्यमंत्री असताना वेगळा न्याय आणि दुसरे कोणी मुख्यमंत्री असताना वेगळा न्याय या पद्धतीच्या भूमिकेवर पेंग्विन ने डोक्यावर हात मारला असता.

ते म्हणाले, आम्ही तर माननीय उद्धवजींच्या अशा मुलाखती ऐकल्या की ज्यामध्ये नवाब मलिक विषयावर प्रश्न विचारू नका तरच येतो अशाही मुलाखती आम्ही पाहिल्या. मग अशा बाबतीतील गोष्टी स्पष्ट केल्यावर पेंग्विनला हसे येईल म्हणून आदित्यजी असे वायफळ प्रयत्न करू नका. बल्क ड्रग पार्क या प्रकल्पासाठी दिल्लीत जाणे आवश्यक होते. आदित्यजी तुम्ही आणि तुमचे सहकारी सरकार वाचवण्यासाठी सोनिया गांधींना भेटलेले आम्ही पाहिले पण या प्रस्तावासाठी तुम्ही एकही भेट केंद्र सरकारच्या कुठल्याही मंत्र्यांशी किंवा प्रधानमंत्री कार्यालयाशी केलेली दिसलेली नाही. स्वतःचे सरकार वाचवण्यासाठी मात्र पुढे अग्रेसर, मात्र, राज्यातील आपल्या मुलांच्या नोकऱ्यासाठी कदमताल करतायत. या पद्धतीने राज्य अडीच वर्ष चालल्यामुळे आजची राज्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यात राज्याची बदनामी केवढी? तुम्ही आम्हाला प्रश्न विचारताय?

आदित्यजी तुम्ही मनसुख हिरेनलालचा खून विसरलात का? याच राज्यातील मुंबई शहरात राहणाऱ्या एका मोठ्या उद्योजकाच्या घरासमोर स्फोटकांची गाडी या सगळ्यातून काय संदेश दिला जातो. व्यवसायिकाकडून खंडणी गोळा करण्यासाठी वाझे ते तत्कालीन गृहमंत्री हे तुमच्या दिमतीला होते. याच राज्यामध्ये प्रसिद्ध उद्योगपतीच्या घरावर स्फोटक लागली जातात. पोलिसांचे अधिकारी वसुलीचे काम करतात आणि सामान्य माणसाचा खून होतो. उद्योग येतील कसे? त्यावेळेला तुमच्या कुकृत्याने तुम्ही उद्योग येऊ दिले नाहीत. आताच्या तीन महिन्यात प्रयत्न करणाऱ्या शिंदे फडणवीस सरकारला त्यावेळच्या कुकृत्याने आणि आताच्या कुप्रचाराने तुम्ही उद्योग येवू देत नाही आहात. सफल काय होणार आहे.

वेदांत फॉक्सकॉन आणि फॉक्सकॉन यामध्ये फरक करून तुम्ही भ्रम फैलावण्याचा प्रयत्न करत आहात. कदाचित ऑर्थर रोडमधून कदाचित भ्रम फैलवणारी विद्या कशी आत्मसात केली? जेलमधून आपल्याला पत्र आले होते का? आमची तुमच्याकडून ही अपेक्षा नाही आहे. फॉक्सकॉन वेंदातचा प्रश्न असेल तर आमच्याकडेही पत्र आहे. तर वेंदातचे अनिल अगरवाल यांनी स्वतः १४ सप्टेंबरला केले आहे की, आम्ही गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये दोन वर्षापासून जागा शॉर्टलिस्ट केल्या होत्या. त्याबाबत प्रयत्न करत आहोत. पुढे अग्रवाल असे म्हणतात की, गुजरातने दिलेला प्रस्ताव जास्त सवलतीचा होता आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही याच भागामध्ये अजून प्रस्ताव घेवुन येत आहोत. स्वतः वेदांतचे मालक जे सांगतात त्यापेक्षाही वेगळं जर तुम्ही सांगत असाल तर पेंग्विनलाही हसवण्याचा हास्य खेळ तुमच्या पत्रकार परिषदेला म्हणायचे नाही तर काय म्हणायचे? या सगळ्यातून सत्य दडपण्याचा प्रयत्न चालू आहे असा टोला सुद्धा लगावला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.