मुंबई : कंगना राणावत आणि शिवसेना हा संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. मुंबई कोणाच्या बापाची आहे का ? तसेच मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत करणे अशा अनेक स्टेटमेंट्समुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या कंगनाच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. मुंबई महापालिकेने कंगनाच्या पालीहिल मधील ऑफिसवर हातोडा चालवला आहे. बांधकाम करताना अनेक नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याचं सांगत ही कारवाई करण्यात आली आहे.
या वादात आता आमदार नितेश राणे यांनी देखील उडी घेतली आहे. “कंगनाच्या ऑफिसवर जसा बुलडोझर चालवला तसा शाहरुखच्या खानच्या मन्नतवर चालवाल का?” असा सवाल त्यांनी महाराष्ट्र सरकारला विचारला आहे. “आता बीएमसी ‘मन्नत’कडे जाईल का? शक्यच नाही, त्यांची हिंमत नाही, सगळ्यांची वेळ येते.” अशा आशयाचे ट्वीट नितेश राणे यांनी केले आहेत.
Hope the same rule applies to everyone n no one is above the law..
Is the BMC team goin to Khan’s Mannat next?
Ofcuz NO..how can they dare !!!
Sabka time ayega!!— nitesh rane (@NiteshNRane) September 9, 2020
कंगनाने मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणे, मुंबईला पाकिस्तान म्हणणे, या गोष्टींचे आम्हीही समर्थन करत नाहीत, मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने व्यक्तीला देशात कोठेही फिरण्याचा, राहण्याचा अधिकार दिला आहे. एका कलाकाराला मुंबईत येण्यापासून थांबवण आणि त्याला घाबरवण्यासाठी सत्तेचा गैरवापर करून अशी कारवाई करणं ही दादागिरी असल्याचे मत भाजपचे प्रवक्ते प्रवीण दरेकर आणि आशिष शेलार यांनी व्यक्त केले आहे.
आता मुंबई महानगरपालिकेला रोज अशा अनेक अनधिकृत बांधकामांची माहिती देऊ, अशीच तत्पर कारवाई महापालिका त्यांच्यावर देखील करेल का? हेच आता आम्ही पाहणार आहोत असे मत आशिष शेलार यांनी व्यक्त केले.