Latest Marathi News

BREAKING NEWS

नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ? अजामीनपात्र वॉरंट जारी

0

मुंबई | बोगस जातपडताळणी प्रमाणपत्र प्रकरण खासदार नवनीत राणा यांना पुन्हा भोवण्याची चिन्ह आहेत. खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. बोगस जातपडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आलं आहे. शिवडी महानगर दंडाधिकारी कोर्टानं या वॉरंटवर मुलुंड पोलिसांना कारवाईचे आदेश जारी केले आहेत.

नवनीत राणा यांनी मुंबई सत्र न्यायालयात या वॉरंट विरोधात याचिका दाखल केली होती. ही याचिका अद्याप प्रलंबित आहे. मुंबई सत्र न्यायालयानं अद्याप कारवाईला स्थगिती न दिल्यानं शिवडी कोर्टानं पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी 7 नोव्हेंबर रोजी होणार आहे. मात्र तोपर्यंत नवनीत राणांकडे कोणताही दिलासा नाही.

जात प्रमाणपत्रासाठी शाळा सोडल्याचा बनावट दाखला दिल्याचा आरोप नवनीत राणा यांच्यावर लावण्यात आला आहे. नवनीत राणा यांच्या वडिलांनी फसवणूक करुन प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतरनवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.