मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या मेळाव्याला अनेक खळबळजनक खुलासे केले यावरी त्यांनी पुन्हा एकदा आपले बंधू आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. यावेळी त्यांनी आपण शिवसेना का? सोडली तसेच नारायण राणे यांनी शिवसेना सोडली नसती पण काही बडव्यांमूळे नारायण राणेंनी शिवसेना सोडली असा खुलासा त्यांनी यावेळी सभेत केला होता.
यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले नारायण राणे शिवसेना सोडणार नव्हते मी त्यांना फोन करून विचारला नारायण राणे हे तुम्हा काय करत मी बोलू का बाळासाहेबांशी त्यावेळी ते म्हणाले की बोलून बघा त्याच्या होकारानंतर मी बाळासाहेबांना फोन केला की नारं राणे आपल्याला भेटायला येणार आहेत त्यावेळी बाळासाहेब हो म्हणाले.
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मी नारायण राणे यांना होकार कळवळा मात्र काही वेळात मला फोन आला त्याला आता बोलावू नकोस यावेळी मागे कोणीतरी पुटपुटत होत पण कोण होत हे मला माहिती नाही असा खुलासा राज ठाकरे यांनी करून नव्या चर्चांना सुरवात केली होती
तसेच ज्या प्रकारचं राजकरण सुरु होत त्याचा शेवट हा झाला… मला त्यांच काय झालं याचा फरक पडत नाही परंतु जे नाव मी लहानपनापासून पाहत आलो ते टांगताना पाहून त्रास झाला असंही ठाकरे यावेळी म्हणाले.