राज्यात शिंदे फडणवीस सरकार साठवण झाल्यापासून महानगर पालिकेसांसह सर्व निवडणुकीअनसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केले आहे. मुंबईसह कल्याण आणि सर्व महापालिकांचे डब्बे जोडले जाणार आणि ही एक्सप्रेस तुफान गतीने धावेल, असं म्हणतं मुंबईसह सगळ्या महापालिका भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना जिंकेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याणच्या सभेमध्ये बोलून दाखवला.
भगवा तलावाचे सुशोभिकरण आणि मलशुद्धीकरण केंद्र आंबिवली, मलशुध्दीकरण केंद्र वाडेघर आणि बी.एस.यु.पी. अंतर्गत बांधलेल्या सदनिकांचे प्रकल्पबाधितांना वाटप, अशा विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी एकनाथ शिंदेंनी नागरिकांशी संवाद साधला.कल्याणसाठी स्वतंत्र धरणाची जी मागणी होत आहे, त्यासाठी काळू धरणासाठी राज्य सरकारने ४१० कोटींचा निधी फॉरेस्टला दिला असून लवकरच या धरणाची प्रक्रिया देखील पूर्ण होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
कल्याण हे ऐतिहासिक शहर असून या शहराच्या विकासासाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नाही. कल्याण पश्चिम व कल्याण पूर्व येथे दोन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल्स उभारावीत यासाठी नगर विकास विभागाच्या माध्यमातून व शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. तसेच कल्याणकरांची मेट्रोची मागणी मागणी लक्षात घेऊन मेट्रो१२ चा आराखडा तयार करण्याच्या सूचना संबंधित प्रशासनाला दिल्या. चांगल्या घरात रहायला मिळावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते आज बीएसयुपी योजनेतील घरकुले ५०० कुटूंबाना देता आली याचे विशेष समाधान वाटत असल्याचे मनोगत यावेळी व्यक्त केले.