कोल्हापूर | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यासाठी भरतीच्या जनता पक्षाकडून जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे. अवघ्या एक महिन्याच्या आत मोदी सरकारमधील तीन बड्या नेत्यांकडून कोल्हापूर दौरा होत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर भाजप कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी जय्यत तयारी सुरु असल्याचे स्पष्ट झाले आहे.
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी 19 आणि 20 फेब्रुवारी रोजी कोल्हापूर दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी विकासकामांचा आढावा घेतला. यानंतर 28 जानेवारी रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी कोल्हापूर दौऱ्यावर आले. त्यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावाही पार पडला. यानंतर आता भाजपचे चाणक्य समजले जाणारे अमित शाह (Amit Shah) 19 फेब्रुवारी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यातही कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे.
दरम्यान, भाजपकडून सुरु करण्यात आलेल्या जोरदार तयारीनंतर दोन्ही मतदारसंघातील इच्छुक तसेच शिंदे गटाची सुद्दा धाकधूक वाढत चालली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनीमात्र भाजपच्या तयारीकडे आव्हान म्हणून न पाहता खोचक शब्दात टोला लगावला आहे. अमित शाह कोल्हापूर दौऱ्यावर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी विचारण्यात आले. यावर बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, “आमच्याकडेही फवारणी असून त्यामध्ये कमळ फुलणार नाही.” राजू शेट्टी बुधवारी पत्रकार परिषदेत कोल्हापुरात बोलत होते.