मुंबई | वास्तव चित्रपटाउन नावारूपाला आलेले दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर कायम वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असतात. महेश मांजरेकर लवकरच अभिनेता अक्षय कुमार याची मुख्य भूमिका असलेल्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ सिनेमाच्या प्रॉडक्शनची जबाबदारी देखील महेश मांजरेकर यांच्या खांद्यावर आहे.
आपल्या आगामी प्रोजेक्टमुळे चर्चेत आलेले महेश मांजरेकर आता मुलाच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत महेश मांजरेकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
महेश मांजरेकर निर्मित ‘एका काळेचे मणी’ ही कॉमेडी सीरिज रीलिज झाली आहे. सीरिजच्या निमित्ताने महेश मांजरेकर यांनी नातेसंबंधांबाबत मोठं वक्तव्य केलं. ज्यामुळे मांजरेकर तुफान चर्चेत आले आहेत. ‘माझा मुलगा जर गे रिलेशनशिपमध्ये असेल तर मी त्याचा स्वीकार करेल…’ अशी स्पष्ट भूमिका महेश मांजरेकर यांनी मांडली.
महेश मांजरेकर म्हणाले, ‘आपण मराठी प्रेक्षकांना कमी का लेखतो..’ असा प्रश्न देखील त्यांनी याठिकाणी उपस्थित केला. ‘मराठी प्रेक्षक देखील समजदार आणि पुढरलेल्या विचारांचे आहेत. समाजात नक्की काय सुरु आहे, याची त्यांना कल्पना आहे. याआधी देखील मराठी सिनेमांमध्ये अनेक नवीन प्रयोग झाले आहेत…’
पुढे ते म्हणाले की, आजच्या घडीला आपण प्रत्येक नातेसंबंधांचा स्वीकार आपण करायला हवा. जोपर्यंत लोक अशा नात्यांचा स्वीकार करत नाहीत तेपर्यंत अनेक अडचणी निर्माण होत राहतील. यामुळे आत्महत्येसारख्या घटना समोर येतात. माझा मुला जर मला म्हणाला मी गेसोबत रिलेशनशीपमध्ये आहे. तर मी त्याचा स्वीकार करेल. कारण ते त्याचं आयुष्य आहे.
पुढे महेश मांजरेकर म्हणाले, ‘त्याचं आयुष्य मी त्याला त्याच्या इच्छेनुसार जगू देईल.. फक्त मुलगाच नाही तर, उद्या माझी मुलगी जरी म्हणाली, मी समलैंगिक नात्यामध्ये आहे, तिचा देखील मी स्वीकार करेल..’ सध्या सर्वत्र महेश मांजरेकर आणि समलैंगिक नात्यावर त्यांनी मांडलेल्या स्पष्ट भूमिकेची चर्चा रंगली आहे.