Latest Marathi News

BREAKING NEWS

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर बारमध्ये जसे नाचतात तसे हे ४० बंडखोर टेबलावर नाचले

0

आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. तानाजी सावंत हे गद्दार असल्याची टीका त्यांनी यावेळी बोलताना केली. यासोबतच तानाजी सावंत यांनी केलेल्या टीकेलाही आदित्य ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तानाजी सावंत यांनी ‘आदित्य ठाकरे कोण आहेत? फक्त एक आमदार..अशी टीका काही दिवसांपूर्वी केली होती.

यावर आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांना आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मी आदित्य उद्धव ठाकरे साधा आमदार असून महाराष्ट्राचा आमदार आहे, असे उत्तर आदित्य ठाकरे यांनी दिलं.डॉक्टर तानाजी सावंत यांनी आदित्य ठाकरे कोण आहेत? मला माहित नाही. ते फक्त आमदार आहेत, एवढंच मला माहिती आहे, असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्याला आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं.

आदित्य ठाकरे मंगळवारी तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेत शेतकऱ्यांची संवाद साधला आहे. यावेळी बोलताना तानाजी सावंत एक गद्दार असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.आदित्य ठाकरे म्हणाले, की मी ज्या रस्त्याने आलो त्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेले पैसे रद्द केले गेले. याच रस्त्याचा त्रास मला झाला. मला वाटलं की रस्त्यावर खेकडे आले की काय? असं वक्तव्य करून आदित्य ठाकरे यांनी तानाजी सावंत यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

आदित्य ठाकरे यांनी यावेळी बोलताना शिंदे गटातील आमदारांवरही निशाणा साधला. आदित्य ठाकरे म्हणाले, की उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर हे चाळीस बंडखोर टेबलावर नाचले. टेबलावर नाचणारे राज्यकर्ते मंत्री होऊ शकत नाहीत. बारमध्ये जसे नाचतात तसे हे टेबलावर नाचले, अशी टीका शिंदे गटातील 40 बंडखोर आमदारांवर आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.