Latest Marathi News

BREAKING NEWS

मुख्यमंत्री एकनाथ शिंद यांच्या हस्ते प्रसादच्या पुस्तकाचं जोरदार प्रकाशन

0

 

मराठी चित्रपटसृष्टीतीळ 2022 हे वर्ष प्रसाद ओकने गाजवलं असं म्हणणं वावगं ठरणार नाही. या वर्षात तो दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून यशस्वी झाला. या दोन क्षेत्रात कौशल्य गाजवल्यानंतर आता प्रसाद ओक नवीन क्षेत्रात पाउल टाकण्यासाठी सज्ज झाला आहे. तो आता लेखक या रूपाने आपल्या भेटीस आला आहे.

प्रसाद ओकने आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित “माझा आनंद” हे पुस्तक लिहिलं आहे. आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी दिवशी म्हणजेच 26 ऑगस्ट रोजी प्रसादने ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली होती. अखेर त्याच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला आहे. प्रसाद ओकचा एक अभिनेता म्हणून धर्मवीर आनंद दिघे या भूमिकेपर्यंत पोहोचवण्याचा प्रवास या पुस्तकातून सर्वांना जाणून घेता येणार आहे.

आनंद दिघे यांच्या भूमिकेसाठी प्रसाद ओक यांनी कशी तयारी केली, त्याची मेहनत, त्याला आलेले अनुभव या त्याच्या प्रवासावर त्याने हे पुस्तक लिहिले आहे. ‘माझा आनंद’ या पुस्तकाचं नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचे अनावरण करण्यात आलं. प्रसाद ओकने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी विविध फोटोही पोस्ट केले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.