Latest Marathi News

BREAKING NEWS

बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांच्या हाती शिवबंधन, संजय राठोड यांना धक्का

0

 

बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. महंत सुनील महाराज यांच्या शिवसेना प्रवेशामुळे मंत्री संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ झाली असल्याचे म्हटले जात आहे. महंत सुनील महाराज यांच्यासह बंजारा समाजाच्या अनेक कार्यकर्त्यांनी ‘मातोश्री’वर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असणाऱ्या पोहरादेवीचे सुनील महाराज महंत आहेत. मंत्री संजय राठोड यांना पुन्हा मंत्रीपद मिळावे यासाठी महंत सुनील महाराज यांनी प्रयत्न केले होते. संजय राठोड यांना एका युवतीच्या आत्महत्येप्रकरणात मंत्रिपद सोडावे लागले होते. राठोड यांच्या पाठिशी बंजारा समाजाला उभे करण्यासाठी सुनील महाराज यांनी पुढाकार घेतला होता.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर सुनील राठोड यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळाले. मंत्रिपद मिळाल्यानंतर संजय राठोड यांनी महंतांना भेट नाकारली होती. त्यानंतर सुनील महाराज आणि संजय राठोड यांच्या वितुष्ट निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली होती.

या संदर्भात महंत सुनील महाराज यांनी म्हटले की, नवरात्रोत्सवात मोठा निर्णय घेणार असल्याचे याआधीच जाहीर केले होते. त्यानंतर आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. पोहरादेवी येथे येण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आमंत्रण देण्यात आले आहे. निवडणूक लढवण्याबाबत उद्धव ठाकरे आणि बंजारा समाज निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.