Latest Marathi News

BREAKING NEWS

मुकेश अंबानी मदत करतायत; आईच्या तब्येतीबाबत राखी सावंतने दिली माहिती

0

अभिनेत्री राखी सावंत ही ‘ड्रामा क्वीन’ या नावाने ओळखली जाते. राखी ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. राखीने काही दिवसांपूर्वी आदिल खान दुर्रानीसोबत लग्न केले. राखीच्या आईची तब्येत गेल्या काही दिवसांपासून बिघडली आहे. राखीच्या आईवर उपचार सुरु आहेत. राखीने नुकतच मीडियासोबत चर्चा करताना सांगितलं की, “तिच्या आईच्या उपचारासाठी उद्योजक मुकेश अंबानी हे तिची मदत करत आहेत.”

नुकताच राखीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये राखी ही तिच्या आईच्या प्रकृतीबाबत सांगाताना दिसत आहे. राखी म्हणाली की, “अंबानी जी हे माझी मदत करत आहेत. तसेच नामदेव जोशी देखील मदत करत आहेत. उपचारासाठी जिथे जास्त पैसे खर्च करावे लागणार आहेत, ते कमी करण्यासाठी मला ते मदत करत आहेत. माझ्या आईला उपचारासाठी दोन महिने रुग्णालयात दाखल करावे लागणार आहे.

तसेच माझ्या आईचं अर्ध शरीर पॅरालाईज्ड झालं आहे. तिच्या स्मरणशक्तीवर देखील परिणाम झाला आहे.” राखीच्या व्हायरल व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केली आहे. ‘राखी, काळजी करु नको, तुझी आई लवकर बरी होईल’, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. तर अनेकांनींदुवा मागितली आहे. काही दिवसांपूर्वी राखी सावंत हे बिगबॉस मराठी सीजनमध्ये दिसून आली होती या सीजनमध्ये ते टॉप 5 मध्य पोहचली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.