मुंबई | अभिनेता नसरुद्दीन शहा हे आपल्या अभिनयाने जितके ओळखले जातात तितके ते आपल्या वादग्रस्त विधानामुळे चांगलेच चर्चेत असतात. नसीरुद्दीन शाह स्पष्टवक्ते आहेत. ते त्यांचं मत ठामपणे मांडतात. अनेकदा त्यांच्या चाहत्यांकडून त्यांना समर्थन मिळतं तर अनेकदा विरोधाचा सामना देखील करावा लागतो. नुकतंच नसीरुद्दीन शाह यांनी असंच वक्तव्य केलं आहे ज्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
अशातच अलीकडेच एका मुलाखतीत या अभिनेत्याने मुघल भारतावर राज्य करत होते त्याविषयी आपलं मत मांडलं आहे. नसीरुद्दीन शाह यांनी नुकतेच मुघलांबाबत वक्तव्य केले आहे.
आजकाल शाह ZEE5 च्या वेब सीरिज ‘ताज – डिवाइडेड बाय ब्लड’ साठी चर्चेत आहेत. यामध्ये त्यांनी राजा अकबराची भूमिका साकारली आहे. ही वेब सिरीज मुघलांच्या राजवटीतील राजे आणि सम्राटांच्या आयुष्यावर आधारित आहे. या वेब सीरिजच्या प्रमोशनवेळी मुघलांचा अपमान करू नये, असे शाह यांनी म्हटले आहे.
द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना शाह यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी शाह यांना विचारण्यात आले की, या देशामध्ये मुघलांविषयी फार चांगले मत नाही त्याकडे तुम्ही कसं पाहता. यावर उत्तर देताना शाह म्हणाले, “हे खूप मजेदार आहे. म्हणजे, लोक अकबर आणि नादिरशाह किंवा बाबरचा पणजोबा तैमूरसारखा खुनी आक्रमक यांच्यातील फरक सांगू शकत नाहीत.” शाह पुढे म्हणाले, “हे लोक इथे लुटायला आले होते, मुघल इथे लुटायला आले नव्हते.