सिव्हिल सर्जन कार्यालयात गुलाबपुष्प देत गांधीगिरी आंदोलन ; बेकायदेशीर प्रतिनियुक्त्या रद्द करण्याची मागणी
सोलापूर |
सोलापूर सिव्हिल सर्जन कार्यालयात गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी आंदोलन करण्यात आले.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सामाजिक संघटनेचे उमेश काळे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले.सिव्हिल सर्जन कार्यालयात बेकायदेशीर प्रतिनियुक्त्या केल्या आहेत त्या तात्काळ रद्द कराव्यात अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली आहे.यावेळी सिव्हिल सर्जन कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी विष्णू पाटील यांना,निवेदन देऊन मागणी करण्यात आली.
सिव्हिल सर्जन कार्यालयाच्या बोर्डाला गुलाबपुष्प लावत निषेध करण्यात आला.सोलापूर सिव्हिल सर्जन कार्यालयात अनेक वर्षांपासून बेकायदेशीर प्रतिनियुक्त्या करण्यात आल्या असून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते उमेश काळे यांनी दिली आहे.यामध्ये मेडिकल बिल,मेडिकल सर्टिफिकेट,कौंटर सही,आदी कामासाठी नागरिकांकडून पैसे उककळे जात आहेत असा आरोप उमेश काळे यांनी केला आहे.सिव्हिल सर्जन कार्यालयात या बेकायदेशीर प्रतिनियुक्त्या रद्द केल्या नाही तर,मोठे जनआंदोलन करू असा इशारा यावेळी दिला आहे.