Latest Marathi News

BREAKING NEWS

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘शिवतीर्थ’वर जाऊन घेणार राज ठाकरेंची भेट

0

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाणार आहेत. यंदा पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबियांनी नव्या घरी गणपती बसवला असून गणेश दर्शनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री शिंदे आज संध्याकाळी राज ठाकरेंच्या दादर येथील निवासस्थानी पोहचतील. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीमुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

२ महिन्यापूर्वी एकनाथ शिंदे( यांनी केलेल्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. तब्बल ५० आमदारांना सोबत घेत शिंदे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच धक्का दिला. शिंदे यांच्या बंडाच्या पवित्र्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या हातून सत्ता निसटली. त्यानंतर खरी शिवसेना आम्हीच असा दावा एकनाथ शिंदे गटाकडून करण्यात आला. बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत असा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे.

शिवसेनेतील या फुटीमुळे ठाकरे घराण्यातील महत्त्वाचे नेते असलेले मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. त्यानंतर राज ठाकरे यांनी प्रदीर्घ मुलाखत देत या संपूर्ण प्रकारावर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांना दोषी धरलं. त्याचसोबत उद्धव ठाकरे विश्वासार्ह व्यक्ती नाही असं सांगत राज यांनी थेट हल्लाबोल केला. त्यानंतर शिंदे गट मनसेत विलीन करण्याची वेळ आली तर विचार करू असंही राज ठाकरेंनी म्हटलं होते.

Leave A Reply

Your email address will not be published.