मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अजूनही शिवसेनेतली त्यांच्याकडील नेत्यांची गळती रोखण्यात यश येईना, कारण रोज एक नवा नेते ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात सामील होत आहे. आता आनंदराव अडसूळ यांचा शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आनंदराव अडसूळ शिंदे गटात जाणार का? अशा राजकीय चर्चांणा उधाण आलंय.
आनंदराव अडसूळ हे अमरावतीचे माजी खासदार आहेत. गेल्या निवडणुकीत नवनीत राणा यांच्याविरोधात त्यांना हार पत्करावी लागली होती. गेल्या अनेक दिवसात उद्धव ठाकरे यांना अनेक हादरे बसले आहेत. अनेक नेत्यांनी त्यांची साथ सोडत शिंदे गटात जाण्यात भलं मानलं आहे. तिच गळती अजूनही थांबत नाही. अजूनही नेते त्यांना सोडून जातच आहे. आगामी काही दिवसातही अनेक नेते साथ सोडण्याची शक्यता आहे. त्यातच आत अडसुळांच्या राजीनाम्याने अनेक सवाल उपस्थित केले आहेत.
आनंदराव अडसूळ शिवसेनेसाठी एक महत्वाचे नेते असून सध्या ते ईडीच्या चौकशीच्याही फेऱ्यात अडकले आहेत. गेल्या काही दिवसात त्यांची अनेकदा चौकशी झाली आहे. तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाने छापा टाकला होता.
तसेच ईडीने त्याची चौकशी केली असून त्यांच्या घरातून अनेक कागदपत्रे, मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त केले आहेत. अनेक नेत्यांना ईडी आणि सीबीआयची भिती दाखवून भाजप हे करवत आहे, असा आरोप वारंवार शिवसेना आणि महाविकास आघाडीतून होत असल्याचे पुन्हा हे वाढण्याची शक्यता आहे.