Latest Marathi News

BREAKING NEWS

बार्शीत दोन चिमुकल्यांसह आईची विहीरीत उडी मारुन आत्महत्या

0

बार्शी |

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील कुसळंबमध्ये दोन चिमुकल्यांसह आईची विहीरीत उडी मारुन आत्महत्या केली आहे . या घटनेमुळे सर्वत्र हळहळ वक्त केली जात आहे. रोहिणी काशीद असे महिलेचे नाव असून त्यांनी आपल्या दोन मुलासह त्यांच्याच शेतातील विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केली आहे. ,रोहिणी ऊर्फ अनुराधा बाबासाहेब काशीद, अनिष बाबासाहेब काशिद वय दीड वर्ष व अक्षरा बाबासाहेब काशीद वय चार महिने अशी या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या माय-लेकरांची नावे आहेत. विद्युत मोटारी लावून सायंकाळी चार वाजता तिघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले.

नोव्हेंबर 2019 मध्ये बाबासाहेब काशीद यांनी खडकोणी येथील दिलीप शिंदे यांची मुलगी रोहिणी ऊर्फ अनुराधा हिच्याशी दुसरा विवाह केला. पती बाबासाहेब हे कामानिमित्त तर सासरे प्रभाकर हे बार्शीला बँकेतून पगार आणण्यासाठी गेले होते. दोन चिमुरड्यांना घेऊन उडी घेऊन आत्महत्या केली.

Leave A Reply

Your email address will not be published.