Latest Marathi News

BREAKING NEWS

अमोल कोल्हे यांच्या नावावर सोशल मीडियावर सुरुय धक्कादायक प्रकार

0

 

सोशल मीडियाचा वापर वाढल्यामुळे हल्ली ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार दिवसेंदिसव वाढत चालले आहेत. फक्त सर्वसामान्य लोकच नव्हे तर राजकीय नेते आणि कलाकारसुद्धा या गोष्टींचा सामना करताना दिसून येत आहेत. नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या सोबत घडलेला असाच एक गैरप्रकार उघड केला आहे. अमोल कोल्हे हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात.

ते सतत राजकारण आणि मनोरंजनसृष्टीविषयी नवनवीन पोस्ट शेअर करत असतात. आपल्या पोस्टमधून ते आपले कार्यकर्ते आणि चाहत्यांसोबत नेहमीच संवाद साधत असतात. तसेच अनेक विषयांवर ते आपलं मत मांडताना दिसून येतात.चाहते आणि कार्यकर्ते त्यांच्या प्रत्येक पोस्टला भरभरून प्रतिसाद देत असतात. शिवाय अमोल कोल्हे महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी झालेलं आपले दौरे आणि त्यादरम्यान घडलेल्या चांगल्या-वाईट घटनाही शेअर करत असतात.

दरम्यान अमोल कोल्हे यांच्या एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. या पोस्टमुळे सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी नमूद केलं आहे की, त्यांच्या नावाने सोशल मीडियावर फसवणूक केली जात आहे. एका फेक आयडीच्या साहाय्याने लोकांकडून पैसे उकळण्याचे प्रकार चालू असलायचं त्यांनी उघड केलं आहे.

सोबतच त्यांनी आपल्या खऱ्या आयडीसह फेक आयडी शेअर करत या दोघांमध्ये कोणता फरक आहे हे सांगितलं आहे. सोबतच त्यांनी स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. ज्यामध्ये त्यांच्या नावे कशाप्रकारे फसवणूक चालू आहे हे त्यांनी दाखवलं आहे. डॉ. अमोल कोल्हे पोस्ट- @kdr.amol या नावाने Instagram profile बनवून लोकांना मेसेज पाठवले जात आहेत आणि पैशाची मागणी केली जातेय. फोटो नाव सेम दिसत असलं तरी या फेक प्रकारापासून सावध रहा असा सल्ला त्यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.