Latest Marathi News

BREAKING NEWS

आदित्य ठाकरेंच्या मोदी सरकार वाढवणार अडचणी; ५०० कोटींच्या भूखंडाची चौकशी होणार

0

 

शिंदे-फडणवीस यांच्या नव्या सरकारचे पहिले अधिवेशन आहे. दुसरीकडे, शिवसेना आणि शिंदे गटात वाद आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे आणि शिवसेना गट एकमेकांना शह देण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. यातच आता केंद्रातील मोदी सरकारच्या रडारवर आदित्य ठाकरे आले आहेत. ५०० कोटींच्या एका भूखंडासंदर्भात चौकशीचे आदेत केंद्रीय पर्यावरण विभागाने दिल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री असताना नवी मुंबईमध्ये एका देवस्थानाला देण्यात आलेल्या दहा एकर भूखंडाची चौकशी केली जाणार आहे. दक्षिण नवी मुंबईतील उलवे नोडमध्ये दहा एकर भूखंड आंध्र प्रदेशातील तिरुपती तिरुमल्ला देवस्थानाच्या प्रति तिरुपती बालाजी मंदिरासाठी देण्यात आला असून याच निर्णयाची आता चौकशी केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. या दहा एकर भूखंडाची किंमत ५०० कोटी रुपये इतकी आहे.

केंद्रामध्ये सत्तेत असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारअंतर्गत येणाऱ्या केंद्रीय पर्यावरण विभागाने आदित्य ठाकरेंना हा धक्का दिला आहे. तिरुपती बालाजी संस्थानाला महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत दिलेल्या भूखंडाची चौकशी होणार आहे. पर्यावरण विभागाकडून या दहा एकर भूखंडाच्या हस्तांतरणासंदर्भातील चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. सीआरझेड वन प्रकारातील हा भूखंड देवस्थानाला देऊन फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला असून त्याच पार्श्वभूमीवर ही चौकशी केली जाणार आहे

Leave A Reply

Your email address will not be published.