Latest Marathi News

BREAKING NEWS

मोहित कंबोजांचे वक्तव्य म्हणजे ब्लॅकमेलिंगचा प्रकार

0

 

भाजप नेते मोहित कंबोज यांनी पावसाळी अधिवेशनापूर्वी केलेल्या ट्वीटने खळबळ उडाली आहे. लवकरच राष्ट्रवादीचा मोठा नेता तुरुंगात जाणार असल्याचे विधान कंबोज यांनी केले आहे.त्यांच्या याचं विधानावरून आता विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत भाजपवर पलटवार केला आहे. तर मोहित कंबोजांचे वक्तव्य म्हणजे भाजपकडून केले जाणारे ब्लॅकमेलिंगचा प्रकार असल्याचं उत्तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिले आहे.

माध्यमांना प्रतिक्रिया देतांना दानवे म्हणाले की, भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय यंत्रणा बटिक झाल्याचं स्पष्ट होतोयं. हेच मोहित कंबोज आधीही बोलत होते आणि तसं घडलेलं आहे. याचा अर्थ भारतीय जनता पार्टीला विचारूनच केंद्रीय यंत्रणा निर्णय घेतात. तर सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशीच्या मागणीला योग्य उत्तर देऊ असे दानवे म्हणाले.

तर या धमक्याच असून, ब्लॅकमेलिंगचा भारतीय जनता पार्टीकडून केला जात असलेला प्रकार आहे. धाक धमक्या दाखवण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे याला योग्य ते उत्तर सभागृहात देऊ असे दानवे म्हणाले. तसेच सभागृहाच्या बाहेर सुद्धा महाविकास आघाडीम्हणून आम्ही योग्य उत्तर देऊ. शिवसेनेकडून जारी करण्यात आलेला व्हीप शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेल्या सर्वांना लागू होतो,असेही दानवे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.