नवी दिल्ली: देशाला स्वतंत्र मिळले तेव्हा तत्कालीन काँग्रेस सरकारने खाजगीकरण उद्योगांचे सरकारीकरण करण्यावर भर दिला होता. मात्र आज भाजपा सरकारने सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण करण्यावर भर दिला आहे. त्यात देशभरात जाळे पसरलेल्या रेल्वेचे लवकरच खाजगीकरण करण्यात येत असून देशातील ४ स्थानके निवडण्यात आलेली आहे.
केंद्रातील मोदी सरकारने सरकारी कंपन्यांचे मोठ्या प्रमाणात खाजगीकरण करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात सरकारकडे फक्त ५ बँका आणि २ विमा कंपन्या फक्त शिल्लक राहणार असून इतर सर्व कंपन्या खाजगी तत्वावर चालवण्यासाठी देण्यात येणार आहे.
सरकारने आत्मनिर्भर भारत या योजनेची घोषणा करताना सांगितले होते की सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधील हिस्सा विकून त्याचे खासगीकरण केले जाणार आहे. यात सरकारच्या मालकीच्या असलेल्या विमा कंपन्यांचा समावेश नव्हता. कारण या कंपन्या पब्लिक सेक्टर अडरटेकिंग मानल्या जात नाहीत. पण आता काही रिपोर्ट्सनुसार मोदी सरकार विमा कंपन्यांचे खासगीकरण करणार आहे.