Latest Marathi News

BREAKING NEWS

मनसे नेते अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी;

0

ठाणे । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाड्वाच्या मेळाव्याला राज्यातील अनधिकृत मशिदीवर कारवाई करण्याचे राज्य सरकारला सूचित केले होते तसेच राज ठाकरेंनी माहीम आणि सांगली येथील दर्ग्यावरचा मुद्धा उपस्थित करताच अवघ्या १२ तासाच्या आता त्यावर कारवाई करण्यात आली अशातच आता मनसेचे शिलेदार आणि नेते अविनाश जादव यांनी सुद्धा मुब्र्यातील अनधिकृत मशिदीवर हातोडा चावण्याच्या सूचना ठाणे मनपाला दिल्या होत्या अशातच आता अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचे वृत्त समोर आले आहे. अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी देणारी क्लिप व्हायरल होत असल्याचे मनसेने म्हटले.

प्रकरण असे की माहीम आणि सांगली येथील दर्यावर करण्यात आलेल्या कारवाई नंतर मुंब्र्यातील अनधिकृत दर्गा तोडण्यासाठी अविनाश जाधव यांनी १५ दिवसांचा अल्टिमेट दिला होता. मनसेच्या या इशाऱ्यानंतर जिल्हा प्रशासन आणि वन विभागाने तात्काळ संबंधित ठिकाणची पाहणी केली होती. जिल्हा प्रशासन व वनविभागाने मुंब्रा डोंगरावर पाहणी करून चौकशी सुरु केली असतानाच काही मुस्लीम धर्मांध याविरोधात एकवटण्यास सुरुवात झाली असल्याचे मनसेने म्हटले.

अशातच काहींनी अविनाश जाधव यांना, ” हम उसे जिंदा नही छोडेंगे … कोई गुस्ताख छुप न पाएगा … हम उसे ढुंड ढुंड के मारेंगे … ” अशा आशयाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. एस आर कमिटी … बॉयकॉट अविनाश जाधव अशा आशयाच्या या व्हिडीओतील धमकी देणारी व्यक्ती दिसत नाही, असे मनसेने म्हटले आहे. या धमकीनंतर महाराष्ट्र सैनिक संतप्त झाले आहेत. या व्हायरल व्हिडीओची दखल घेत मनसे ठाणे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांनी नौपाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.