Latest Marathi News

BREAKING NEWS

आजचा दिवस राजकीय घडामोडींचा, मालेगावात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार

0

मुंबई । एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून भारतीय जनता पक्षाबरोबर सरकार स्थापन केले तसेच स्वात मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले तसेच सरकार स्थापन झाल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हाचा शिंदे गटाचा बाजूने निकाल दिल्यानंतर उद्धव ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला होता. मागील काही दिवसांपासून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रभोदन यात्रेच्या माध्यमातून शिंदे गटासह भाजपावर निशाणा साधताना दिसून येत आहे

काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी खेड रत्नागिरी येथे आमदार योगेश कदम यांच्या मतदार संघात रेकॉर्डतोड सभा पार पडली होती आता त्या पाठोपाठ आवाज मालेगावात उद्धव ठाकरे यांची सभा पार पडणार आहे मालेगाव हा मंत्री दादा भुसे यांचा मतदार संघ असून आज सभेला उद्देशून उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून आजची सभा सुद्धा खेड प्रमाणे यशस्वी होणार का हे आज सायंकाळी दिसून येईल

या सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी गेल्या दोन दवसांपासून शिवसेना खासदार संजय राऊत हे मालेगावमध्ये दाखल झाले आहेत. या सभेच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसात राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. मालेगावमध्ये ठिकठिकाणी उद्धव ठाकरेंच्या सभेचे बॅनर लागले आहेत. मालेगाव येथील एमएसजे महाविद्यालयाच्या प्रांगणात रविवारी सायंकाळी सात वाजता जाहीर सभा होणार असून या सभेची जय्यत तयारी करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.