Latest Marathi News

BREAKING NEWS

मयत दिव्यांग वैष्णवी कुरुळे यांच्या कुटूंबियांला आमदार राऊत सांत्वनपर भेट

कुटूंबियांना सर्वतोपरी मदत करण्याचे आमदाराचे आश्वासन

0

बार्शी |

बार्शी तालुक्यातील चिखर्डे या गावातील मृत झालेल्या दिव्यांग वैष्णवी कुरुळे हिच्या घरी कुटुंबास सांत्वनपर भेट दिली. यावेळी आमदार राजेंद्र राऊत, तहसीलदार सुनील शेरखाने, पोलीस उपविभागीय जालिंदर नालकूल, पांगरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल, माजी उपनगराध्यक्ष नवनाथ चांदणे, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच प्रकाश पाटील उपस्थित होते.

तालुक्यातील चिखर्डे या गावातील दिव्यांग असलेल्या वैष्णवी कुरुळे या मुलीचा बाल रुग्णालयात उपचार घेत असताना दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेसंबंधी वर्तमान पत्र व डिजिटल मिडीयामधून अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने या घटनेचे गांभीर्य ओळखून मी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांच्या सोबत संपर्कात असून, याबाबत योग्य ती पुढील कारवाई करण्यात येत आहे.

रामचंद्र कुरूळे यांच्या दुस-या अपंग मुलांचे पालकत्व मंजूर झाले असून, त्या आधारे पंचायत समिती स्तरावरून पिठाच्या चक्कीचा लाभ पालकांना दिला आहे. कुरूळे कुटुंबासाठी राजीव गांधी व मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी विशेष प्रयत्न असणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.